ड्रूमची ३० मिलियन डॉलर्सची निधी उभारणी

0

मुंबई : भारतातील पहिला आणि सर्वात मोठा ऑटोमोबाइल व्यवहार मंच ड्रूमने सिरीज डीमध्ये ३० मिलियन डॉलर्सची निधी उभारणी केली आहे, जिचे नेतृत्व टोयोटा सुशो कॉर्पोरेशनने (टोयोटा समूह सदस्य) आणि सह-नेतृत्व डिजिटल गॅरेज ऑफ जपानने केले होते. नव्याने उभारलेल्या निधिचा उपयोग भारतात ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटमध्ये ड्रूमचे वर्चस्व अधिक भक्कम करण्यासाठी करण्यात येईल, ज्या मार्केटमध्ये मार्केट शेअरचा 70% भाग सध्या त्यांच्याकडे आहे. शिवाय या निधिचा उपयोग त्यांची ईकोसिस्टम सेवा उपकरणे अधिक स्केलेबल करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक विस्तार करण्यासाठी करण्यात येईल. ड्रूमने दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्व आशियात विस्तारासाठी, बाजारपेठेत आपले जागतिक आकर्षण मजबूत करण्यासाठी टोयोटा सुशो कार्पोरेशनसोबत सामंजस्य करारदेखील केला आहे.

फंड उभारण्याच्या या फेरीत एलिसन इन्व्हेस्टमेंट्स- एशिया स्थित गुंतवणूक व्यवस्थापक तसेच अनेक वर्तमान गुंतवणूकदार आणि महत्त्वाचे संस्थात्मक गुंतवणूकदार आणि चीन, हाँगकाँग व दक्षिण पूर्व आशियातिल फॅमिली ऑफिसेस सामील झाले होते, ज्यामधून भारतातील ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटमध्ये आपल्या वर्चस्व असलेल्या स्थितीतून ड्रूमने किती विश्वास निर्माण केला आहे ते निदर्शनास आले.

ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल म्हणाले, “गेल्या साडेतीन वर्षात खरेदीदार / विक्रेते यांच्याकडून स्वीकृती, श्रेणींचे प्रकार आणि सूची,भौगोलिक विस्तार आणि जीएमव्ही/व्यवहार यांचा विचार केल्यास ड्रूमने खूप विकास केला आहे. निधीच्या या फेरीत टोयोटा सुशो कार्पोरेशन सारख्या महत्त्वाच्या गुंतवणूकदाराचा पाठिंबा आम्हाला लाभला आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. ड्रूमसाठी ही भागीदारी महत्त्वाची आहे कारण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही आमच्या विकासाच्या शक्यता ओळखल्या आहेत.लाइटबॉक्स, बीनेक्स्ट आणि बीनॉस यांनी खूप सुरुवातीसच आमच्यावर विश्वास दाखवला आणि गेली ४ वर्षे त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे हे आमचे भाग्य आहे. ड्रूमच्या आगामी आंतरराष्ट्रीय विस्तराच्या पार्श्वभूमीवर, आशियात आमचा गुंतवणूकदारांचा बेस वाढविण्यासाठी एलिसन इन्व्हेस्ट्मेंट्सशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”