मुंबई : ड्रूम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ऑटोमोबाइल बाजारपेठेने नव्याने सुरु केलेल्या ‘टॅक्सीज’ या विभागाअंतर्गत आपल्या मंचावर जुनी टॅक्सी खरेदी आणि विक्री करण्यासाठी खरेदीदार आणि विक्रेत्यांना सक्षम बनविले आहे. या जुन्या टॅक्सी एक लाख रुपये किंवा त्याहून अधिकच्या किंमतीमध्ये उपलब्ध असतील. विक्रेते आणि खरेदीदार ओबीव्हीच्या सहाय्याने वाहन स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी ड्रूमचा इको प्रमाणित तपासणी अहवाल सुद्धा ऑर्डर करू शकतील.
ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल म्हणाले, “ड्रूम भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन ऑटोमोबाईल मंच असून आमचा प्रयत्न मंचावर ऑटोमोबाइल क्षेत्राशी निगडित सर्व श्रेणी उपलब्ध करून देण्याचा आहे जेणेकरून ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होतील.
आम्हाला वापरलेल्या टॅक्सींची खरेदी करण्यासंदर्भात ग्राहकांकडून विचारणा झाली म्हणून आम्ही आमच्या वाहनांच्या यादीत अशा वाहनांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. ‘टॅक्सीज’ विभागाच्या माध्यमातून आम्हाला नवीन ग्राहक आणि बाजारपेठापर्यंत आमची पोहोच वाढविणे शक्य झाले आहे. “