नवापूर । शहरातील शितल सोसायटी भागातील जलाराम मंदिराच्या मागील बाजूस ड्रेनेज लाईन चोकअप झल्याने पाणी मंदिराच्या प्रांगणात येत असून पाण्याची दुर्गन्धी येत असल्याने भाविकांना तोंडावर रुमाल बांधून देव दर्शन करावे लागत आहे.
नवापूर नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी व नगरसेवक यांनी याबाबत त्वरित लक्ष देऊन उपाय योजना करावी. नवापूर नगर पालिकेच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.