ड्वॅन ब्राव्होने घेतला थांबण्याचा निर्णय; निवृत्तीची घोषणा

0

चागुरामास- वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 35 वर्षीय ब्राव्होने विंडीजकडून सप्टेंबर 2016 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्याने एकूण 270 आंतरराष्ट्रीय सामन्यांत विंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. वेस्ट इंडिजच्या दोन ट्वेंटी-20 विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तो म्हणाला,”सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्ती जाहीर करत आहे. 14 वर्ष वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. 2004 मध्ये लॉर्ड क्रिकेट मैदानावर चषक स्वीकारल्याचो तो क्षण अजूनही स्मरणार्थ आहे.

मात्र त्याने व्यवसायिक क्रिकेट खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ब्राव्होचा उत्कृष्ट खेळ अनुभवता येणार आहे. ब्राव्होने 40 कसोटी सामन्यांत 2200 धावा आणि 86 विकेट घेतल्या आहेत. वन-डेत 164 सामन्यांत त्याच्या नावावर 2968 धावा आणि 199 विकेट आहेत.