चिंबळी : गेल्या काही दिवसांपासून सतत पडलेल्या रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला होता. परंतु गेल्या आडवड्याभरापासून हवामानात बद्दल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह वाले, मुग, उडीद, भुईमुग आदी पिकांवर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पानावर लहान-लहान किड्यांनी पोखरले आहे. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. पिके पिवळे पडू लागले असल्याने शेतकरी वर्गांना पुन्हा महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे.