‘ढिंच्याक पूजा’च्या चाहत्यांना मोठा झटका

0

मुंबई : सोशल मीडिया आणि यू ट्यूबच्या माध्यमातून अचानक चर्चेत आलेली ढिंच्याक पूजा तुम्हाला माहिती असेलच. आवाज बेसूर आणि विचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळत आहे. बेसूर आवाज असला तरी चर्चेत राहणार्‍या ढिंच्याक पूजाला एक झटका बसल्याचं समोर आलं आहे. कारण, ढिंच्याक पूजाचे सर्व व्हिडिओज यू ट्यूबवरुन हटविण्यात आले आहेत.

ढिंच्याक पूजा
‘सेल्फी मैने लेली आज’ या गाण्याच्या माध्यमातून चर्चेत आलेली आणि सर्वांपर्यंत पोहोचलेली ढिंच्याक पूजा आपल्या नवनव्या गाण्यांमुळे आणखीनच चर्चेत आली. ढिंच्याक पूजा ही किती प्रसिद्ध आहे हे तिच्या यू ट्यूब पेज सबस्क्राईबच्या आकड्यांवरुनच स्पष्ट होतं. ढिंच्याक पूजा अतिशय बेसूर आवाजात आणि विचित्र गाणी गात असली तरी तिच्या गाण्यांना लाखोंमध्ये व्ह्यूव्ज मिळत आहेत. तसेच या गाण्यांच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमवत असल्याचंही समोर आलं आहे. पण आता हीच ढिंच्याक पूजा अडचणीत सापडल्याचं चित्र आहे.

हेल्मेट शिवाय गाडी चालविल्याने आली होती अडचणीत
ढिंच्याक पूजाने काही दिवसांपूर्वी रिलीज केलेलं आपलं गाणं म्हणजेच दिलों का ‘स्कूटर है मेरा स्कूटर’. हे गाणं रिलीज झाल्यानंतर तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती कारण, तीने हेल्मेट शिवाय गाडी चालविल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे गाणं यू ट्यूबवरुन हटविण्यात आलं.

पण, आता ढिंच्याक पूजाचे सर्वच गाणी यू ट्यूबवरुन हटविण्यात आली आहेत. कथप्पा सिंग या व्यक्तीच्या विनंतीवरून यूट्युबने ढिंच्याक पूजाचे व्हिडीओ हटविल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, हे कथप्पा सिंग या व्यक्तीच्या विनंतीवरुन हटविण्यात आले आहेत की तांत्रिक चुकीमुळे डिलीट झाले आहेत याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.