मुंबई : नेटकर्यांना ढिंच्याक पूजा हे नाव काही अपरिचित नाही. आपल्या विचित्र गाण्यांसाठी ती ओळखली जाते. याच कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी ढिंच्याक पूजाचे व्हिडीओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. पण ढिंच्याक पूजा या अपयशाने हिरमुसून न जाता परत आली आहे. आता ती बापू दे दे थोडा कॅश हे नवे गाणे घेऊन दाखल झाली, सोशल मीडियावर सध्या त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कटप्पा सिंह याच्या विनंतीवरून जुलै महिन्यात युट्युब चॅनेलवरून ढिंच्याक पूजाचे 12 व्हिडीओ डिलीट करण्यात आले होते.