ढेकूसिम अटाळे – पिंपळे चिमणपुरी रस्त्याचे भूमिपूजन

0

अमळनेर । मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आमदार शिरीष चौधरीच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या ढेकूसिम -अटाळे ते पिंपळे चिमनपुरी रस्ताचे खडीकरण, डांबरी करणासह जलनिस्सारणचे बांधकाम करणे या कांमाचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरीच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. या रस्तामुळे परीसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षाची समस्या सुटली असून अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. सुमारे 4.19 कि.मी लांबी असलेला हा रस्ता 2 कोटी 65 लाख 50 हजार एवढ्या निधीतून पूर्ण होणार आहे. ठेकेदारास नोंव्हेबर 2017 पर्यंत काम पूर्ण करावयाचे आहे. सदर कामांतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासह 4 पाईप मोर्‍या अटाळे गावाजवळ 15 रोची पाईप मोरी ढेकू गावाजवळ 6 मिटरचे 4 गाळे व छोटापूल तसेच 30 मीटरची सरंक्षक भिंत बांधकाम येणार असल्याची माहिती आमदार चौधरी यांनी यावेळी सांगितले.

या गावांना होणार फायदा
नविन रस्तामुळे ढेकूसिम, आंबासन, चारम, आटाळे, पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, आर्डी अनोरे यासह इतर गावांना मोठा फायदा होणार असून ही सर्व गावे व्यवहारिक दृष्टया एकमेकांशी जोडली जाणार आहेत. सदर रस्ता गेल्या वर्षांपासून कच्चा स्वरूपात होता. यामुळे ग्रामस्थांना कसरत करतच वाहने चालवावी लागत होती, ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष घातले नव्हते, मात्र आमदार शिरीष चौधरींनी या रस्ताचे महत्व ओळखून मंजुरी मिळवल्याने मोठा दिलासा या गावांना मिळाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आमदार चौधरींना सर्वांनी धन्यवाद दिले आहेत.

उद्घाटन प्रसंगी यांची होती उपस्थिती
ढेकूसिम सरपंच अंजनाबाई प्रताप भिल, उपसरपंच नाना पाटील, उमेश पाटील, भगवान पाटील, प्रकाश पाटील, ग्रामसेविका कविता साळुंखे, आटळ्याचे माजी सरपंच भरत पाटील, मधुकर पाटील, आटळ्याचे ग्रामसेवक नितीन पाटील, विठ्ठल महाराज, प्रताप सोनवणे, कुसुमबाई सोनवणे, धुडकू भिल, गणेश पाटील, गणेश राजपूत, बापू सोनवणे, तसेच पं.स. उपसभापती उदय पाटील, प्रा.अशोक पवार, सुदंरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील उपसरपंच आर्डी अनोरे, सुदाम चौधरी सर्व गावांचे ग्रामस्थ व सा.बां. विभागांचे उपअभियंता एस.एन.वाघ, कनिष्ठ अभियंता व्ही.एन.पाटील, तांत्रिक सहाय्यक चंद्रशेखर पाटील, कनिष्ठ अभियंता एस.के. बडगुजर आदी उपस्थित होते.

कामाचे श्रेय घेवू नये -चौधरी
आमदार शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांनी ‘गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे बस’ पोहोचविण्याचा शब्द तालुका वासियांना दिला आहे. या कार्याच्या निमित्ताने त्यांची शब्दपूर्ती होतांना दिसत असून आणि परिसरातुनही आता बाराही महिने बस धावु शकणार आहे, विशेष करून विद्यार्थी वर्गाला हा मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ह्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार स्मिता वाघ यांनी चार महिन्यापूर्वी केले होते. त्यासाठी स्वतः ना.पंकजा मुंडे यांना विनंती करून ते काम आणले ते काम पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत टाकले होते. परंतु राज्य शासनाने ही योजना बदलून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या हेडखाली सुरु झाली त्यात ते काम टाकले व यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष यांना पत्राद्वारे देखील सूचविले होते. एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन करणे योग्य नाही. अशा कामांची भूमिपूजन करून जनतेची दिशाभूल करू नये असे आ.स्मिता वाघ यांनी भ्रमणध्वनी द्वारे सांगितले.

कामाचे श्रेय घेणे चुकीचे
ह्या रस्त्याचे भूमिपूजन आ.स्मिता वाघ यांनी चार महिन्यापूर्वी केले होते. त्याठिकानी रस्ता व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती व स्वतः पाठपुरावा केला त्यासाठी ना. पंकजा मुंडे यांना विनंती करून ते काम आणले ते काम पंतप्रधान ग्राम सड़क योजने अंतर्गत टाकले होते त्यात झाले नाही व राज्य शासनाने हेच काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेखाली काम टाकले व यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष यांना सूचविले होते. एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन करणे योग्य नसून काम सूचविले नसताना फुकटचे श्रेय घेणे चुकीचे आहे.