ढेकूसीम येथे निराधारांना विविध योजनांचे मंजूरी पत्र

0

अमळनेर । तालुक्यातील ढेकूसिम अंबासन चारम येथे निराधार लाभार्थ्यांना आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते श्रावण बाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी योजनेचे मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांतर्फे आमदारांचा सक्तार करण्यात आला. ढेकूसीम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदय नंदकिशोर पाटील, अनिल महाजन, सुनील भामरे, उमेश पाटील, सरपंच अंजनाबाई भिल, उपसरपंच नाना पाटील, मोतीराम पाटील, सुभाष पाटील, ग्रामसेविका कविता साळुंखे, भगवान पाटील, डोंगर सोनवणे, बाळू पाटील, शिवाजी पाटील, लाभार्थी मधुकर पाटील, शांताराम पाटील, चंद्रकांत पाटील, अंबरसिग राजपूत, सिंधुबाई पाटील, अरुणाबाई पाटील, प्रताप भिल ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थीत होते.

पाणीपुरवठ्याचा केला पाठपुरावा
श्रावण बाळ योजनेचे, इंदिरा गांधी योजनेचे व संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार चौधरींचे आभार व्यक्त केले. दरम्यान ढेकू सिम अंबासन, चारम येथे 15 दिवसांनी पाणी येते होते व विहीर अधिग्रहण असून देखील बंद होते. आमदार शिरीष चौधरींना ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांना फोन लावून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तसेच ढेकुसिम येथे नवीन ग्रामपंचायत व व्यायाम शाळा बांधण्यात येईल असे आश्वासन आमदार चौधरी यांनी ग्रामस्थांना दिले. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.