Eichhers loaded with dhepe sacks from Raver’s Choriya market रावेर : शहरातील छोरीया मार्केटसमोरून ढेपेच्या सात टन वजनांनी भरलेली पाच लाख रुपये किंमतीची आयशर गाडी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री साधली संधी
31 ऑक्टोंबरच्या रात्री नऊ ते 1 नोव्हेंबरच्या सकाळी आठ दरम्यान रावेर-बर्हाणपूर रस्त्यावरील छोरीया मार्केटसमोरून चोरट्यांनी ढेपेचे सात टनांनी भरलेली आयशर (एम.एच.04 जी.सी.6915) लांबवली. बालाजी अॅग्रो इंण्डस्ट्री, दयापूर येथून या वाहनात सात टप ढेप भरण्यात आली होती मात्री मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी फिरोज खान रज्जाक खान (54, अफू गल्ली, रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.