जळगाव । गावागावांना जोडण्याचे काम हे रस्ते करीत असतात. तसेच सामान्य जनतेला शासनाकडून फक्त रस्ते आणि पाणी पुरवठा इतकीच मापक अपेक्षा असते. ते पुरविण्याचे शासन प्रयत्न करीत असते. पंरतु अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या अकार्यक्षम कामगिरीमुळे सामान्य जनतेला हाल अपेष्टा सहन करावी लागते. असेच प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील ढोरमाळ या गावात होत असतांना दिसत आहे. या गावात शासनाच्या निधीतून रस्ते बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. परंतु ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनात येत आहे.
संबंधीत ठेकेदारांकडून रस्त्याची निकृष्ट दर्जाची होत असल्याचे दिसून येत आहे. अशी तक्रार ढोरमाळ येथील ग्रामस्थानी केली आहे. शासनाच्या निधीतुन गावागावात जनेच्या सुख सुविधेसाठी रस्ते निर्मिती केली जात आहे. ढोरमाळ येथे देखील रस्त्याचे कामे सुरु आहे. संबंधीत ठेकेदारांकडून या कामात कुचराई केली जात असून रस्ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. सिमेंट, खडी, रेती, डांबर हे कमी प्रमाणात वापरले जात असल्याने हे रस्ते किती दिवस टिकतील? असा प्रश्न ढोरमाळ ग्रामस्थांना पडला आहे. शासनाने या कामकाजाकडे त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.