पिंपरी-चिंचवड । अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांना लागले आहेत. गणेशोत्सवाची पूर्वतयारीदेखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरू केली आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे, ढोल-ताशा. ढोल-ताशांचा मंडळांकडून जोरदार सराव केला जात आहे. शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे सदस्य दररोज सायंकाळी एकत्र येऊन ढोल-ताशा वादनाचा सराव करत आहेत. हा सराव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. लहानांपासून मोठ्या सदस्यांपर्यंत सर्वांचा कसून सराव सुरू आहे.