जळगाव । सुटीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांनी भरून गेले होते. यात प्रथमच शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर आश्चर्यमिश्रींत आनंद पहावयास मिळत होता. तर काही विद्यार्थ्यांनी पुढील वर्गांत गेल्याने त्यांना नवीन वर्ग, नवीन वर्ग शिक्षक याबाबत कुतूहल पहावयास मिळाले. नव्या कोर्या वह्या, नवीन गणवेश, नवीन सत्राची पुस्तके व नव्या अशा उमेदीने मुले उत्साहपुर्ण वातावरणात शाळेच्या नवीन सत्राची सुरुवात झाली.
उंटावरुन निघाली मिरवणूक
काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत स्वत: शिक्षक मुख्याध्यापक व कर्मचारी वर्गातर्फे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच उभेराहुन पुष्पगुच्छ देवून हर्षोउल्हासात करण्यात आले. तर काही शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात मुलांचे स्वागत केले. काही ठिकाणी गुलाबपूष्प देऊन स्वागत केले. पुस्तके वाटप करण्यात आली. मुलांचे औक्षण करुन प्रवेशोत्सव साजरी, काही शाळांमध्ये शिरा वाटप करण्यात आला. उंंटांच्या स्वारीने मिरवणूक काढून स्वागत केले. प्रभात फेरी काढण्यात आली. जन जागृतीच्या माध्यमाने काही शाळांनी स्वच्छतेचा संदेश दिला. काही ठिकाणी शाळांमध्ये खाऊ वाटप करण्यात आला. नविन सत्रात मुलांच्या स्वागतःसाठी शाळेला रंगरंगोटी करुन वर्गांमध्ये सुंदर पताका लावल्या हात्या, सुंदर व आकर्षक रांगोळी काढण्यात आली.
भा. का. लाठी विद्यामंदिर
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसासटी संचलित भाक़ा़ लाठी विद्यामंदिरात विद्याथ्र्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला़ याप्रसंगी विद्याथ्र्यांची वाद्याचा गजरात स्वागत फेरी काढण्यात आली़ तसेच विद्याथ्र्यांचे औक्षण करुन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले़ स्वागतानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ मुख्याध्यापक गजमल नाईक यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी उपाध्यक्ष दिलीप लाठी, मुकुंद लाठी, श्री़ मुंदडा, घनश्याम लाठी, सचिन इंगळे, पालक वसंतराव पाटील उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी पाटील यांनी केले़
आर.आर. विद्यालय
आर. आर. विद्यालयात बॅण्डच्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. मुख्याध्यापक डी.एस. सरोदे, विजया काबरा, पर्यवेक्षक एस.बी. अत्तरदे आदी उपस्थित होते.
सु.ग. देवकर प्रायमरी स्कुल
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करुन व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शालेय प्रवेशद्वारावर सजावट व रांगोळी काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अभिजीत देशपांडे, दिलीप मुथा, सुरेंद्र लुंकड, मुख्याध्यापिका साधना महाजन, सुकदेव थोरात, बालवाडीच्या मुख्याध्यापिका वृषाली दलाल आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रशांत साखरे तर आभार योगेश वंजारी यांनी मानले.
निमखेडी येथे गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
युवा विकास फाऊंडेशन संचलित प्राथमिक विद्यामंदिर, निमखेडी येथे मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत सजावट करुन तसेच रांगोळी काढण्यात आली होती. यशस्वीतेसाठी दिपक भारंबे, दिपनंदा पाटील, स्वाती पगारे आदींनी कामकाज पाहिले.
गुळवे विद्यालयात विद्यार्थिनींना शिरा वाटप
पुष्पावती खुशाल गुळवे माध्यमिक विद्यालयात बँडच्या गजरात विद्यार्थ्रांची शालेर आवारापासून परिसरातील लगतच्रा मार्गावरुन ढोल-ताशांच्रा गजरात उत्साही घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरीचे स्वागत मुख्याध्यापिका एच.आर. पाटील, पर्यवेक्षक डी.आर. माळी व शिक्षकांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. प्रार्थनेनंतर इ.5 वी ते 8वीच्या वर्ग विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके करण्यात आले. विद्यार्थीनींना चॉकलेट व शिरा वाटप करण्यात आले.
सोनवणे विद्यालयात मोफत पुस्तक वाटप
मोहाडी रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात व गुलाबपुष्प देऊन स्वागत प्रभारी मुख्याध्यापक गणेश बागुल यांनी केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्र.मुख्याध्यापक गणेश बागुल हे हाते. कार्यक्रमाचे प्रास्तवीक सुरेखा जोशी यांनी केले. सुत्रसंचालन टिना सोनवणे यांनी केले तर भारती शिंपी यांनी केले. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेतील उषा मंगळे यांच्या हस्ते करण्यात आले
बालनिकेतन विद्यामंदिरात गुलाबपुष्प देऊन स्वागत
बालनिकेतन विद्यामंदिर व नविन माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर जंगले, संस्थेचे सचिव गोवर्धन पाटील, मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे व डॉ. रविंद्र माळी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. इ. 1ली ते 9 वीतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. वंदना धांडे यांनी सुत्रसंचालन यांनी केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, रशिदा तडवी, राहुल धनगर, श्रीकांत पाटील, संगिता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, निलेश नाईक आदींनी सहकार्य केले.
न्यू. इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रभात फेरी
न्यू. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूल कमिटीचे अध्यक्ष अरविंद लाठी, प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी, सचिव मुकूंद लाठी, मुख्याध्यापक योगेश चौधरी, भा.का. लाठी शाळेचे मुख्याध्यापक नाईक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पालक विजय पांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या रॅलीस हिरवा झेंडा देण्यात आला.
चांदसरकर प्रा़ विद्यालय
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै़ गिरीजाबाई नथ्थू शेठ चांदसरकर प्राथमिक विद्या मंदिरात शाळेच्या पहिल्या दिवसाचा प्रवेश विद्याथ्र्यांची उंटा वरुन मिरवणूक काढण्यात आली़ तसेच यावेळी संस्थेचे अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी, संचालक प्रमोदभाऊ चांदसरकर यांनी इलेक्ट्रीक रिमोट कंट्रोलची कार शाळेतील विद्याथ्र्यांना भेट दिली़ संचालिका सुप्रियाताई चांदसरकर, सिमाबाई चांदसरकर यांनी मार्गदर्शन केले़ तर, पालक प्रतिनिधी प्रदीप दारकोंडे व श्रीमती कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विद्याथ्र्यांना गुलाबपुष्प देण्रात आले. महेश तायडे, जयश्री पाटील, जयश्री मेने, शारदा चौधरी, प्रज्ञा राणे, अमोल सोनकुळ, स्वप्निल भोकरे, तुषार जोशी, पूनम पाटील, भूषण अमृतकार आदींनी काम पाहिले़
खडके विद्यामंदिरात जनजागृतीपर रॅली
स्वा.सै. जनार्दन सुका खडके प्राथमिक विद्यामंदिरात इ.4 थीच्या विद्यार्थ्यांच्या बॅन्डपथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. औक्षण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. परिसरात रॅली काढण्यात आली. कार्यक्रमास अवधूत पाटील, राजशेखर, चंदन अत्तरदे, एस.डी. खडके यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप झाले. मुख्याध्यापिका निर्मला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, कर्मचार्रांनी परिश्रम घेतले.
इकरा शाहीन उर्दू स्कूल
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक शेख गुलाब इसाक, खान अतीकुल्लाह, शेख इफ्तेखार गुलाम रसुल, शेख साबीर, शेख जाकीर, शेख रोशन, शेख काशिफ, मुमताज खान, अनिसा शेख उपस्थित होते.
खुबचंद विद्यालय
खुबचंद सागरमल विद्यालयात शाळेच्या विद्यार्थाचे औक्षण केले. मुख्याध्यापक सतिश साळुंखे, पर्यवेक्षक सुरेश आर्दिवाल, योगेद्र पवार, मंगला सपकाळे, निता झोपे, लक्ष्मीकांत महाजन, उज्वला गोहील, विजय पवार, कल्पना देवरे, राजेश इंगळे, योगिनी बेंडाळे, सुनिता साळुंखे, संतोष चौधरी, भास्कर कोळी, प्रविण पाटील, पंकज सुर्यवंशी, राहुल देशमुख, मयुर पाटील, लिखिता बोरसे, सुनिता येवले उपस्थित होते़
अभिनव विद्यालय
अभिनव विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप झाले. संस्थाध्यक्ष शाम कोगटा, उपाध्यक्ष संजय बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. पालक दिलीप दहाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. मुख्याध्यापक सरोज तिवारी उपस्थित होत्या. सुत्रसंचालन दिप्ती नारखेडे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार कांता मोरे यांनी मानले.
शां.ल. खडके विद्यामंदिर
शांताबाई लक्ष्मणराव खडके प्राथमिक विद्यामंदिरात विविध आकर्षक,आकृतीबंधातील रेखीव अशा विविध रंगांचा वापर करुन काढलेल्रा रांगोळ्या, शालेर आवारात रंगीबेरंगी कागदी पताका लावून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी आल्यानंतर मुख्याध्यापिका अंजना सुरवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.
प.वि.पाटील विद्यालय
के.सी.ई. सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय (एम.जे.कॉलेज जळगाव) येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्रापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थ्रांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. ढोल ताश्यांच्या गजरात विद्यार्थांची मिरवणुक काढण्यात आली़ मिरवणूक मार्गावर विद्यार्थ्रांचे पालक तसेच शिक्षक वृंद आणि नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. याप्रसंगी संस्थेचे शालेय समन्वयक के.जी.फेगडे व शिक्षण समन्वक चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते विद्याथ्र्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, धनश्री फालक, सरला पाटील, कल्पना सपकाळे, रेखा पाटील, चित्रलेखा गुरव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.