तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी येवले यांची निवड

0

चाकण : कान्हेवाडी तर्फे चाकण ( ता.खेड ) येथील ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बाळासाहेब येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेविका माधुरी झेंडे यांनी दिली.

गावात शांतता राहावी, म्हणून सरपंच शांता दत्तात्रय येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीची सालाबादप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेत विविध कामांविषयी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडलेल्या शंका व सूचनांचे या सभेत निरसन करण्यात आले. गावात वृक्षलागवड, संगोपन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते दुरुस्ती या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच शांता येवले, उपसरपंच राहुल येवले, आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार, ग्रा. पं. सदस्य विनोद येवले, कुंदा पवार, मिरा येवले, कल्पना कडलक, भाग्यश्री येवले, ग्रामसेविका माधुरी झेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.