तंटामुक्त गाव कामपुरास पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस

0

शिंदखेडा। महाराष्ट्र शासनाची तंटामुक्त गाव या योजनेत शिंदखेडा तालुक्यातील कामपुर हे गाव तंटामुक्त म्हणुन राज्य शासनाने घोषीत केले आहे. शासनाकडुन घोषित झालेले बक्षीस खान्देशचे नेते, राज्य रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तंटामुक्तीचे दोन लाख रुपयाचा धनादेश घेतांना तंटामुक्त अध्यक्ष योगेश पाटील, उपाअध्यक्ष भाऊसाहेब पाटील ,मा.सरपंच जितेंद्र गिरासे,डॉ. कारंजकर, विनोद पाटील, भरत गिरासे, सचिन पाटील, दिलीप गिरासे दुगेॅश पाटील, नंदकिशोर पाटील, शाम पाटील आदी कामपुरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

गावकर्‍यांचे केले कौतुक
तसेच गावात कुठल्याही प्रकारचा तंटा किंवा वाद न होवु देता जातीय व सामाजिक सलोखा राखला व गांवला तंटामुक्त पुरस्कार मिळविला या कार्याने प्रभावित होवुन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सुद्धा आपल्या आमदार निधीतुन दोन लाख रुपये बक्षीस स्वरुपात वेगळा धनादेश देऊन तंटामुक्तीचे अध्यक्ष योगेश पाटील व त्यांचे सहकारी यांचा सत्कार केला.