खिरोदा गावातील दुर्दैवी घटना ; सावदा पोलिसात 18 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
फैजपूरः गारबर्डी धारणावरून दुचाकीवरून भाऊ-बहिणी येत असताना खिरोदा येथील तरुणीची काही मुलांनी छेड काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कारवाईनंतर संतप्त झालेल्या सुमारे 18 टवाळखोरांनी तरुणीच्या भावालाच दुपारी तीन वाजता बेदम मारहाण केली तर हा वाद सोडवण्यासाठी खिरोदा गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंदा जनार्दन चौधरी व त्यांच्या सोबतचे विशाल बाळू महाजन गेल्यानंतर टारगटांनी या दोघांनाच जबर मारहाण केली. गोविंदा चौधरी यांच्या डोक्यला सलई लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचारसाठी सुरू आहेत तर विशाल महाजन यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सावदा पोलिसात विनयभंगाचा तसेच सतरा ते अठरा संशयित आरोपीविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व उपनिरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.