डॉ. वर्षा पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव । एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे. दरारोज नवनविन तंत्रज्ञान येत असून आजचे तंत्रज्ञान जून होत अआहे. या तंत्रज्ञानाच्या युगात आपली तरूण पिढी मागे नको यामूळे त्याच्यांत संशोधन वृत्ती बीजाची रूजवण आताच केली पाहिजे. विद्यार्थी दशेत दिलेले हे धडे कायमस्वरूपी स्मरणात राहतात व त्यातूनच नवनिर्मीती होत असते. यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात संशोधन वृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोदावरी फॉउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील यांनी केले. डॉ उल्हास पाटील इग्लीश सीबीएसई स्कुलमध्ये जिल्हयातील बाल विज्ञान परिषदेच्या तालुका समन्वयकांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळीबाल विज्ञान परिषदेचे गव्हर्नीग सदस्य किशोर राजे,जिल्हा समन्वयक सुनिल वानखेडे, शैक्षणिक जिल्हा समन्वयक बी.बी. जोगी,तज्ञ मार्गदर्शक एस आर झांबरे, गोदावरी स्कुल जळगावच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी आदि उपस्थीत होते.
तंत्रज्ञानात मोठा बदल
गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल होत आहे. सातासमुद्रापलिकडे कुणाशी संपर्क करावयाचा असल्यास पत्र अथवा टेलीफोनची मदत घ्यावी लागत होती मात्र आता तर अवघ्या काही सेंकदात एकमेंकाशी चॅटींग व्दारे संपर्क साधता येतो. तसेच विविध जिवनावश्यक वस्तूची निर्मीती देखील झाली आहे. यात भारत देश अग्रेसर असला तरी विदयार्थी दशेतील या बालमनावर विज्ञान परिषदेच्या माध्यमातून संशोधनाचे धडे गिरवले जात आहेत. हेच विदयार्थी नक्कीच भविष्यातील शास्त्रज्ञ असतील.