तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशाच्या विकासाला मिळणार नव्याने गती

0

जळगाव । भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थ व्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानावर जास्त भर देण्याचे काम आहे. देशाच्या विकासात नवीन तंत्रज्ञान विकासाला जोड आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान विकसित करून कमी खर्च आणि उत्पादन अधिक या पद्धतीने संशोधन करणे अपेक्षित आहे. अभियंता म्हणून आपण शेतीसाठी उपयुक्त तंत्र विकसित करू शकतो का याचा अभ्यास करायला हवा. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि देशाच्या विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन जैन ईरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बालक्रिष्णन जडे यांनी केले.

या मान्यवरांची होती उपस्थिती
जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्रंच, परोक्ष व टेक्निकल रिसर्च पेपर कॉम्पेटीशन फॉर स्टूडेन्ट (टीआरपीसीएस) या कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ओरीयंट सिमेंटचे जनरल व्यवस्थापक अलोक बगारिया, कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, प्राचार्य तुषार पाटील सर, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, उपप्राचार्य प्रा.राकेश तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्पर्धेतून प्रत्येक्ष तंत्रज्ञानाचा व संशोधन पद्धतीचा अनुभव यावा तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती व्हावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य डॉ.प्रभाकर भट यांनी प्रास्ताविकात सांगितले.

तीन विभागात होणार स्पर्धा
नेहमी प्रमाणे याही वर्षी दोन दिवशीय टेकक्रंच, परोक्ष व टीआरपीसीएस या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच गेल्या सात वर्षापासून यशस्वीपणे सुरु आहेत. यावेळी स्पर्धेत देशभरातील सर्व अभियांत्रिकी पॉलीटेक्निक मधील एकूण 1355 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या दोन दिवशीय स्पर्धेत प्रोजेक्ट सादरीकरण, पोस्टर सादरीकरण, एड झ्याप, क्ल्याश ऑफ क्ल्याण, जंक कोर्स, रोबो रेस, सर्किट मानिया, सी-क्विझ मोस्ट वान्टेड व एन.एफ.एस या स्पर्धा होणार आहेत. टीआरपीसीएस या संशोधन स्पर्धेत तीन पातळ्या असून पहिल्या टप्यात द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभाग घेतील. दुस-या टप्यात अंतिम वर्ष तर तिस-या टप्प्यात पदव्युत्तर व पीएचडी सुरु असलेल्यांनी सहभाग नोंदविला आहे. यात टेक्रंच व परोक्ष टेक्नीकल तर टीआरपीसीएस ही संशोधनावर आधारित स्पर्धा आहे. विजेते विद्यार्थ्यांना एकूण स्पर्धांमध्ये तब्बल दोन लाख छप्पन्न हजाराचे रोख परितोषिके देण्यात येणार आहे.

राज्यभरातून मिळाला प्रतिसाद
महाविद्यालयात आयोजित स्पर्धेत गुजरातमधील सुरत, नवापूर, मध्यप्रदेश मधून बर्‍हाणपूर व राज्यातील मुंबई, नाशिक, धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद, अकोला, अमरावती, धुळे, नाशिक, शेगाव, शिरपूर, पुणे, अहमदनगर नागपूर आदी शहरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.प्रसंगी सूत्रसंचालन संदेश तोतला व अम्रिता मोतीरामनी तर आभार समन्वयक प्रा. मनोज बागडे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते.