तंत्रनिकेतन प्राध्यापकाच्या न्यायासाठी दोनशे विद्यार्थ्यांचा तहसीलवर मोर्चा!!

0

मनसे विद्यार्थी सेनेचा पाठींबा

चोपडा – येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलनाला प्राध्यापक व कर्मचारी बसल्याने आज पॉलिटेक्निकच्या महाविद्यालयातील मधील विद्यार्थींनी त्यांना पाठींबा देण्यासाठी कॉलेज पासून थेट चोपडा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहरअध्यक्ष निलेश बारी यांनी मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन नेतूत्व केले होते. बुधवारी सकाळी 10 वाजता कॉलेजच्या प्राचार्य व प्रसासनाने मुलाना आंदोलन व मोर्चा काढण्यासाठी तीव्र विरोध केला होता. तरी देखील पॉलिटेक्निक च्या मुलांनी काही न ऐकता त्यांच्या मागण्यांसाठी चोपडा तहसीलवर मोर्चा काढून चोपडा शहर वाशीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

विद्यार्थी आणि विद्यार्थींनी काढला मोर्चा
महात्मा गांधी शिक्षण मंडळापासून कलोहाना पेट्रोल पंप, शिवाजी चौक, मेन रोड, बाजार पेठ, शनी मंदिर, चावळी मार्गे थेट तहसील कार्यलयावर शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा प्राचार्य व संस्था अध्यक्ष याचे विरुद्ध काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना यावेळी निवेदन देण्यात आले. तहसिलदार दिपक गिरासे यांच्या दालनात सायंकाळी बैठक झाली.मात्र कुठल्याही प्रकारच्या तोडगा निघालेला नाही या मोर्चातनिलेश अहिरे, दिनेश गुजराथी, रोशन परदेशी, दीपेश चौधरी, शिवम लाड, सुशील सोनवणे, निलेश बोरसे, कुलदीप पाटील,निखिल जोशी, प्रणव सोनवणे, मिलिंद महाजन, शुभम गुरव, मानसी अत्तरदे आदी विद्यार्थी उपस्थित होते. धरणे आंदोलनमध्ये प्रा. जयेश भदाणे, प्रा.सागर साळुंके, प्रा.महेश रावतोळे, प्रा.मनोज पाटील, प्रा.प्रशांत बोरसे, प्रा.राहुल बडगुजर, प्रा.लक्ष्मीकांत पाटील, प्रा.सचिन पाटील शिक्षकेतर कर्मचारी, हिरालाल माळी, ज्ञानेश्वर शकपाळ, मनोज कासार, उदयकुमार अग्निहोत्री, योगेश महाजन, नरेंद्र विसपुते सहभागी आहेत. या आंदोलनात नगरसेवक प्रकाश राजपूत, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, रघुनाथ बडगुजर, रघुनाथ माळी, विनोद पाटील, ऋषिकेश भावसार, कल्याण पाटील, रघुनाथ कुमावत, नरेंद्र कुलकर्णी, ज्ञानेश्वर पाटील, संजय बिऱ्हाडे, गोविंद नामदेव पाटील यासह अनेकांनी या धरणे आंदोलनाला पाठींबा दिला आहे.