जळगाव । शेत शिवारात बकर्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेने कोणते तरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उलट्या व चक्कर येत असल्याचे वाटसरुंच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविले. याबाबत अधिक माहिती अशी की, शोभा सुनिल पवार(वय 35, रा.टाकळी, ता.जामनेर) या दैनंदिनीनुसार आज सकाळी बकर्या चारण्यास मोयगाव शेतशिवारात गेल्या असता रस्त्यावर त्यांना पुडीत तंबाखुसारखे दिसल्याने त्यांनी ते खाल्ल्याने त्यांना चक्कर व उलट्या येवू लागल्या. ही बाब रस्त्यावरुन जाणार्या गावकर्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी महिलेच्या पतीला कळवून तातडीने त्यांच्याच दुचाकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.