पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली घोषणा
नंदुरबार-जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनानुसार तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या मागदर्शनाखाली अकरा निकष पूर्ण करुन नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी तंम्बाखूमुक्त अभियान यशस्वी राबविल्यामुळे 15 ऑगस्ट जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी तंबाखूमुक्त शाळांचा जगतील तिसरा जिल्हा जाहीर केला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खा.डॉ.हिना गावित, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जि.प.अध्यक्षा रजनीताई नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये, सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिळणकर, प्रा.डॉ.माधव कदम, निलेश तवर, डॉ.तेजल चौधरी, रवी गोसावी, डॉ.कल्पेश चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील नवी पिढी व्यसनाकडू वळू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी, मु.का.अ., शिक्षण आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, सलाम मुंबई फाऊंडेशन, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वर्षभर सुंदररित्या उपक्रम राबविला. जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना, पत्रकार बांधवांनी सहकार्य केले. आता यापुढेही तंबाखूमुक्त आणि आरोग्यसंपन्न जिल्ह्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, आवाहन सलाम फाऊंडेशनचे तंबाखू नियंत्रण अभियानाचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिळणकर यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम तर आभार रवी गोसावी यांनी मानले.