शिंदखेडा । मुंबई येथील सलाम फांऊडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या तंबाखू मुक्त शाळा या अभियानात जिल्ह्यात जि.प.शाळा बिलाडी तर तालूक्यात जि.प.शाळा देगांवला प्रथम क्रमांक मिळाला असून यांसह दहा शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार शिक्षण सभापती नुतन पाटील, जि.प.सदस्य कामराज निकम,प.स.सदस्य सतिश पाटील, मनोहर देवरे, शिक्षणाधिकारी प्रविण आहिरे, गटशिक्षणाधिकारी मनिष पवार, सलाम फांऊडेशनचे व्यवस्थापक अजय पिरनकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून करण्यात आला. या अभियानात शाळेच्या दोनशे मीटर परीसरात तंबाखू विक्री व खाण्यावर बंदि घालण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्याना तंबाखूच्या दुष्परीणामांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांंची गावात जनजागृती फेरी काढण्यात आली. याअभियानाला जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यांत जिल्ह्यातील दहा शाळांनी हे अभियान प्रभावीपणे राबविले. या अभियानात सहभागी शाळांचे परीक्षण पंकज शिंदे नारायणसिंग गिरासे भटूसिंग राजपूत मोहन पाटील या परीक्षकांनी केले.
सन्मानित शाळा
जि.प. शाळा बिलाडी (जिल्ह्यात प्रथम), जि. प. शाळा देगांव (शिंदखेडा तालूक्यात प्रथम), जि.प. शाळा दिवांगण(ता. धुळे), जि.प. शाळा ब्राम्हणवेल(ता.साक्री), जि. प. शाळा लकडे हनूमान, जि. प. सारंगपाडा भावेर, जि. प. बाटवा, एच. आर .पटेल हायस्कूल, मुन्सीपल हायस्कूल,(सर्व ता.शिरपूर), एस. एन. डि. हायस्कूल होळनाथे.