तक्रारकर्त्यांचे ‘डफडे बजाव’आंदोलन

0

दोषी ठरलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर.पाटील, वनपाल,वनरक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

धुळे । जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वन तलाव कामांच्या तांत्रिकदृष्ट्या परिपुर्ण चौकशीअंती दोषी ठरलेल्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) धुळे .एस.आर.पाटील व वनपाल,वनरक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होवून त्यांच्या वेतनातून रुपये २१,९१,२५७.११ नुकसान भरपाई वसुलीचे आदेश पारीत करावेत या मागणीसाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयासमोर धुळे येथील सुनिल पाटील, विजय वानखेडे,दिलीप शिंदे, सुरेंद्र पाटील आदी तक्रारकर्त्यांनी डफडे बजावो आंदोलन केले.

तटस्थ अधिकार्‍रांची समिती गठीत करा
धुळे वनपरिक्षेत्राचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर.पाटील व संबंधीत वनपाल, वनरक्षक यांनी संगनमताने कट करुन अधिकाराचा दुरुपयोग करुन गरताड येथील निकृष्ट दर्जाची वनतलावाची कामे केली आहेत. वनतलाव गरताड क्र.१,२, ४,६,९, १० व कक्ष क्र.३०८ कामांच्या तांत्रिकदृष्ट्या परिपुर्ण चौकशीत स्पष्टपणे दोषी ठरले आहेत. विभागीय वनअधिकारी (दक्षता),धुळे यांनी म.मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक),धुळे यांच्या स्तरावर सादर केलेल्या चौकशी अहवालातील मुद्देेनिहाय भ्रष्टाचाराची आकडेवारी निश्‍चित करण्यासाठी तटस्थ अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी करण्रात आली आहे.

तासभर वाजविले डफडे
चौकशी समितीत तक्रारदारांचा सहभाग असावा अशी मागणी देखील डफडे बजाव आंदोलन करणार्‍या तक्रारकर्त्यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) वनविभाग, धुळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या आंदोलकांना उपविभागीय दंडाधिकारी, शहर पोलिस ठाणे यांच्याकडून केवळ १ तासाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकांनी एक तास वनविभागाच्या कार्यालयासमोर डफडे वाजवून आंदोलन केले.

तक्रारदारांचा समितीत समावेश करा
रा समितीत तक्रारदारांचा समावेश करण्यात यावा. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) धुळे एस.आर.पाटील व संबंधीत वनपाल,वनरक्षक यांची कामनिहाय गैरव्यवहारातील जबाबदारी निश्‍चित करुन त्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्या वेतनातून महाराष्ट्र शासन नुकसानीची भरपाई वसुलीचे आदेश व्हावेत अशी मागणी रावेळी करण्रात आली. यासह तांत्रिक ज्ञान नसल्याचे लेखी स्वरुपात मान्य करणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी, एस.आर.पाटील यांनी कोणत्या ज्ञानअधिकाराच्या सहाय्याने धुळे वनक्षेत्रात विविध जलसंधारण कामांचे तांत्रिक सर्व्हेक्षण, साईट सिलेक्शन, अंदाजपत्रके तयार करणे, कामांवर देखरेख ठेवणे, कामांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखणे, मोजमाप पुस्तिकेत नमूद परिमाणे व प्रत्यक्ष कार्यस्थळावर झालेल्या कामांची परिमाणे तपासून मोजमाप पुस्तिका, देयकांना मान्यता प्रदान करणे इत्यादी बाबी नियमबाह्य पध्दतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

जलसंधारण कामांचा दर्जा तपासा
एस.आर. पाटील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करुन प्रशासनाची दिशाभुल करुन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात रावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जलयुक्त शिवार अभियांनातर्गत धुळे वनपरिक्षेत्रात एस.आर.पाटील यांचे कार्यकाळात करण्यात आलेल्या सर्वच जलसंधारण कामांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यात यावी. कामनिहाय मोजमाप पुस्तिकेतील नोंदी प्रत्यक्ष झालेल्या कामांची परिमाणे, अदा करण्यात आलेली देयके, कामनिहाय काळीमाती, मुरुम, कठीण मुरुम, मऊ मुरुम, दगड उपलब्ध करुन घेतल्याचे अधिकृत मान्यता प्राप्त खदाणेची नावे, खदाणाचे प्रत्यक्ष कार्यस्थळापासूनचे अंतर व ठेकेदारास प्रदान करण्यात आलेले दर यातील तफावत यांची सुक्ष्म सखोल चौकशी करण्यात यावी. पुराव्यासह भ्रष्टाचाराची आकडेवारी सिध्द करु पाहणार्‍या तक्रारी अर्जांची सुक्ष्म सखोल चौकशी तटस्थ यंत्रणेमार्फत करण्यात रावी.