तक्रारदारांचे सर्व आरोप खोटे

0

जळगाव। ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी आर.आर.विद्यालयातील मुख्यध्यापकांसह 68 शिक्षकांमध्ये अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. 68 कर्मचार्‍यांनी लाठी विरूद्ध दिलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशीकामी शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या गठीत समितीने सादर केलेला अहवाल खोटा व दिशाभूल करून फसवणूक करणारा असल्याची माहिती खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी यांनी पत्रकार परीषदेत दिली. तसेच या प्रकाराबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणीचे पत्र शालेय शिक्षणाधिकारी यांना केली आहे. तरीही चौकशी न झाल्यास पंतप्रधान पोर्टलवर मागणीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे लाठी यांनी सांगितले.

सर्व तक्रारदार 68 शिक्षक कर्मचार्‍यांनी दिलेल्या जबाबावरून तत्का तयार केला व त्यावरून माझ्या विरूद्ध केलेले सर्व आरोप खोटे असून ते मला मान्य नाही, चौकशी अहवालामध्ये गठीत चौकशी समितीने वरिष्ठांच्या निदर्शनस आणून दिली नसल्याने माझी फसवूक करत असून संबंधित शिक्षणाधिकारी व आरोप सिद्ध न करणार्‍यांवर शिक्षण प्रशासनाने यांची चौकशी करून कारवाईची मागणीसाठी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
अरविंद लाठी

अहवालाची चौकशी व्हावी…
तक्रारीतील आरोप तक्रारदारांना मान्य नसतांनाही सत्य वस्तुस्थिती अहवालात नमुद न करता खोटा अहवाल सादर करून वरिष्ठांची फसवणूक केली आहे. उपसंचालकांनी सुद्धा याची दखल न घेता जसाच्यातसा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. म्हणून सदर खोट्या अहवालाची सखोल चौकशी होण्यासाठी मंत्रालयातील सक्षम वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी कामी नियुक्ती करावी व तपासणीअंती दोषींवर कारवाई व्हावी. 7 दिवसात चौकशी न झाल्यास मा.पंतप्रधान पोर्टलवर सदर तक्रार नोंदवून मला चौकशीची मागणी करणार असल्याचे याावेळी श्री लाठी यांनी सांगितले.

68 शिक्षकांनी केली होती तक्रार
आर.आर. विद्यालयातील मुख्याध्यापकांसह 68 शिक्षक कर्मचार्‍यांनी 7 सप्टेंबर 2016 रोजी तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. त्या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकार्‍यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार श्री लाठी यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारींबाबत चौकशी समितीने तक्रारदार 68 शिक्षक कर्मचार्‍यांची चौकशी करून अहवाल मागीतला होत. मात्र व्ययक्तिरित्या सर्वांनी चौकशी समितीस दिलेल्या जबाबात सर्व आरोप केल्याचे नाकारले असून सदर त्यांनी केलेला तक्रार अर्ज खोटा आहे. मात्र शिक्षणाधिकारी यांनी तक्रारदारांच्या बाजूने अहवाल तयार करून खरा असल्याचे दर्शवून खोटा अहवाल तयार करून शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी जसा चा तसा वरष्ठांकडे सादर केला. त्यामुळे सर्वांची संबंधितांची फसवणूक केली आहे. तसेच त्या अहवालाद्वारे शिक्षण संचालकांनी प्रशासक नियुक्तची नोटीस दिली असल्याचे श्री लाठी यांनी सांगितले.