मुंबई । मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असतात. अनेक वेळा ध्वनिप्रदूषण होत असताना नेमकी तक्रार करायची कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलेला असतो. नागरिकांना अशा तक्रारी करता याव्यात म्हणून मुंबई महानगरपालिकेने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्याच बरोबर ध्वनिप्रदूषण निवारण, नियंत्रण, सण उत्सवादरम्यान पदपथावर उभारण्यात येणार्या अनधिकृत मंडप,अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सच्या तक्रारी या क्रमांकावर करता येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
ध्ववनिप्रदूषण, रस्ते पदपथांवर अनधिकृत मंडप व अनधिकृत पोस्टर्स, जाहिरात फलके याबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800223467 सुरु करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकासह 1292 या क्रमांकावरही तक्रारी करता येतील.या क्रमांकावर एमटीएनएल तसेच मोबाईलवरून तक्रार करण्याची सुविधा आहे. क्रमांकावर इतर मोबाईल कंपन्यांकडून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष अधिकार्यांंची नेमणूक
1916 या हेल्पलाईन क्रमांकावरही तक्रार करता येणार आहे. तसेच 9920760525 या क्रमांकावर एसएमएस आणि व्हाट्सअपवर तक्रार करता येणार आहे. त्याचप्रमाणे mcgm.licnpgmail.com या इमेलद्वारेही तक्रार करण्याची पालिकेने व्यवस्था करण्यात आली आहे.
ध्वनिप्रदूषण निवारण व नियंत्रणाकरीता बृहन्मुंबईतील सर्व पोलिस ठाणे निहाय नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिकार्यांची यादी तसेच माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.