जळगाव । वैयक्तीक शौचालयांचे अनुदान घेवूनही बांधकाम न करणार्या अशा 92 अनुदान लाटणार्यांवर मनपा प्रशासनाने काल विविध पोलिस ठाण्यात आरोग्य निरीक्षकांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतू विविध कारणे दाखवून व एकत्र तक्रार करण्याचे कारण दाखवून पोलिस ठाण्यांनी हे गुन्हे दाखल करण्यास नकार दिला. मनपाने आज पोलिसांनी सांगितलेल्या फॉरमेटमध्ये तक्रार तसेच उपायुक्तांच्या सहीने तक्रारी केल्या. तरी पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी या रात्री आठ पर्यंत गुन्हे दाखल केले नाही.
पोलिस अधिकार्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
मनपाने केलेल्या तक्रारीवरून सोमवारी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींनी एकमेकांशी चर्चा करत या तक्रारींवरून गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यासाठी विहित स्वरूपात तक्रार द्यावी, वरिष्ठ अधिकार्यांचे संमतीपत्र द्यावे यासह आणखी काही कारणे देवून गुन्हे दाखल केले नाही. मनपा प्रशासनाने आज देखील आरोग्य अधिकार्यांना तब्बल दहा तास थांबवून देखील गुन्हे नोंदविले नाही. आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी शनिपेठ, शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना भेटले. यावर पोलिस निरीक्षकांनी आम्ही सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी चर्चा करत असून एकत्र गुन्हा दाखल करता येईल का याबाबत विचार करत असल्याचे माहिती मिळाली आहे.