तक्रार नसताना निगडी सेक्टर क्रमांक 22 मध्ये वृक्षांची कत्तल

0

गुन्हा दाखल करण्याची सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांची मागणी

पिंपरी ।  पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक आणि निगडीचे स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने सेक्टर क्रमांक 22 मध्ये राजरत्न बुध्द विहाराशेजारी वृक्षाची तोड करण्यात आली आहे. नागरिकांची कोणतीही तक्रार नसताना अधिका-यांनी वृक्षाची कत्तल केली आहे. त्यामुळे एकीकडे वृक्ष लागवडीसाठी करोडो रुपये खर्च करायचे, अन्ं दुसरीकडे उद्यान विभागाकडून चिडीचूप वृक्ष तोड करायचे धोरण स्विकारले आहे, त्यामुळे संबंधित अधिका-यांसह वृक्ष तोडीस मदत करणा-या नगरसेवकांवर फाैजदारी गुन्हा दाखल करा,  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी केली आहे.

निगडीतील सेक्टर क्रमांक 22 मधील राजरत्न बुध्द विहाराशेजारी वृक्षतोड करण्यात आली आहे. याबाबत कोणाची तक्रार नसताना दहा ते पंधरा वर्षाचे वृक्ष अधिका-यांना तोडला आहे. याविषयी उद्यान विभागातील अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करु लागले आहेत. तसेच चिखलीतील कृष्णानगरमध्ये अशाच पद्धतीने मोठे झाड तोडून लाकडे भरत असलेला ट्रक वृक्षप्रमींनी नुकताच पकडला.

याबाबत चिखली पोलिसांना सांगितले असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव ट्रक ताब्यात घेतला. मात्र, स्थानिक नगरसेवकाने पोलिसांवर दबाब आणल्याने पोलिसांनी झाडाला इजा केल्याचे तक्रारीत म्हणून अदखपात्र गुन्हा नोंदवून तो ट्रक सोडून दिला. हा ट्रक महापालिकेने वृक्ष छाटणीसाठी नेमलेल्या ठेकेदाराचा होता, तसेच वृक्षतोडीबाबत कोणतीही परवानगी नसल्याने उद्यान विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी फिरकलेही नाहीत. शहराच्या विविध भागात असलेली २० ते ३० वर्षांची मोठी झाडे लाकडांसाठी तोडली जात असून यामधून नगरसेवक व उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना हातमिळवणी करु लागले आहेत.