मुंबई : दिग्दर्शक करण जोहरची ड्रीम टीम आता त्याच्या ‘तख्त’ या आगामी चित्रपट दिसून येणार आहे याची घोषणा केली. अनिल कपूर, करिना कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर, रणवीर सिंग आणि जानव्ही कपूर या कलाकारांच्या करणच्या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत.
हे देखील वाचा
आतापर्यंत साकारलेल्या चित्रपटांमध्ये ‘तख्त’ हा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचं करणने एका मुलाखतीत स्पष्ट केलं. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाशी तुलना करत काही बाबतीत हा चित्रपट कभी खुशी प्रमाणेच असेल, असंही म्हटलं. अशा या चित्रपटामध्ये भावाभावांमध्ये होणारे वाद, मतभेद, सूडबुद्धी आणि त्यातून रंगणारं राजकारण या गोष्टी मात्र अधिक प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.
करणचा हा चित्रपट त्याच्या स्टारकास्टमुळेही चर्चेत आहे. त्याविषयीच अधिक माहिती देत त्या सर्व भूमिकांसाठी निवडलेले कलाकार त्याच भूमिकांसाठी योग्य ठरले ज्यामुळेच त्यांची निवड करण्यात आल्याचं सांगितलं.