तज्ज्ञ संचालकपदी अ‍ॅड. ललीता पाटील

0

अमळनेर । येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व जिजाऊ बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. ललीता शाम पाटील यांची जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अ‍ॅड. ललीता पाटील यांचे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य व अनुभव या अनुषंगाने संस्थेच्या झालेल्या बैठकीत सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते अ‍ॅड. ललीता पाटील यांची निवड केलेली आहे. त्यांच्या निवडीने संस्थेच्या विकासासाठी हातभार लागणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संचालक अ‍ॅड. विजय पाटील, संचालिका पुष्पलता पाटील तसेच सर्व संचालक मंडळ व मा.आ. साहेबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.