तडीपार गुंडाला अटक

0

पिंपरी : भांडणे व मारामार्‍यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय 25, रा. काळाखडक झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडणे व मारामारीचे गुन्हे असल्याने परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी त्यास 22 सप्टेंबर 2018 पासून पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आले होते. मात्र, तो इथेच वावरत होता. पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना त्याच्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी भिवसेन सांडभोर, धर्मराज आवटे, मोहम्मद गौस नदाफ, राजाभाऊ बारशिंगे, मयूर वाडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.