तडीपार गुंडास अटक

0
खडकी : येथील एका सराईत अट्टल गुन्हेगारास तडीपार आदेश उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने मंगळवारी अटक केली. तडीपार आदेश उल्लंघण प्रकरणी बोपोडी येथिल अट्टल सराईत गुन्हेगार निखिल उर्फ चंग्या गायकवाड (वय 20 रा.बोपोडी) यास राहत्या घरातुन अटक केली. युनिट चारचे कर्मचारी राजु मचे यांना बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरिक्षक अंजुम बागवान यांच्या आदेशान्वये पोलिस कर्मचारी राजु मचे रमेश साबळे कांतिलाल बनसोडे भालचंद्र बोरकर आदी पथकाने सापळा रचुन गायकवाड यास जेरबंद केले. नंतर त्यास खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले.