खडकी : खडकी ठाण्याच्या हद्दीतील एका तडीपार गुंडास संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने सोमवारी रात्री सापळा रचुन अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव मयुर कालिदास पवार (वय 25, रा.क्रांती चौक ) असे आहे. खडकी पोलीस ठाणे हद्दीत आरोपी पवार याच्यावर तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या आदेशान्वये त्यास दोन वर्षांकरीता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपार आदेश भंग करीत पवार बोपोडी, खडकी परिसरात फिरत होता. पोलीस हवालदार राजु मचे यांना आरोपी पवार सोमवारी रात्री 9 वाजता भाऊ पाटील रोड, बोपोडी येथे येणार असल्याची माहीती खबर्यांकडुन मिळाली. हवालदार मचे, कर्मचारी गणेश काळे व दत्ता फुलसुंदर यांच्या पथकाने धोबी घाट येथे सापळा रचून अटककेली.