चोपडा। ससध्याच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण स्वत:चे अस्तित्व गमावून बसला आहे. तणाव हा सर्वदूर पसरलेला आहे अशावेळी आपल्यातील सुप्त गुणांना वाट मोकळी करून दिली पाहिजे यासाठी संगीत, कला, क्रीडा या क्षेत्रातील छंद जोपासले पाहिजे चित्रकला जीवनाला एक आयाम देणारी कला आहे. ज्यातून तुम्ही विचार करत असलेले चित्र रेखाटता येते चित्रातील विविध रंग हे आयुष्याचे प्रतिक आहेत. तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी कलागुण जोपासणे महात्वाचे आहे, असे प्रतिपादन चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिराच्या सचिव माधुरीताई मयूर शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने 21 फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात आलेल्या महारांगभरण व 9 मार्चला घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या. प्रथम सरस्वतीपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक नरेंद्र भावे (विवेकानंद विद्यालय), प्राचार्य राजेंद्र महाजन (ललित कला केंद्र), राकेश विसपुते (विवेकानंद विद्यालय), ज्योती टाटीया (एसएनआरजी स्कूल), प्रविम प्राथामिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, प्रविम मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा पाटील उपस्थित होते.
महारंगभरण स्पर्धेतील यांचा केला सत्कार
महारंगभरण या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण 16 शाळांच्या 3617 मुलांनी सहभाग नोदावला. तालुकास्तरावरील बक्षीस मिळवणारे विद्यार्थी गट 1 सत्यम इ.1 ली ते 4 थी रोशनी पाटील प्रथम (4 थी प्रताप विद्या मंदिर प्राथमिक विभाग), विशाल मगरे द्वितीय (4 थी विवेकानंद इंग्लिश स्कूल), मानसी शिंदे तृतीय (4 थी ऑक्सफोर्ड इग्लीश स्कूल चोपडा) गट 2 शिवम इ. 5 वि ते 7 वी प्रथम नंदिनी पाटील (6 अ विवेकानंद विद्यालय), द्वितीय तृप्ती शहा (7 इ प्रताप विद्या मंदिर), तृतीय सीमा संतोषकुमार अहिरे (7 वि मिमोसा इंग्लिश स्कूल) गट 3 सुंदरम इ 8 वि ते 10 वि प्रथम सिद्धी महेश नेवे ( 8वी इप्रविम चोपडा ) द्वितीय अपूर्वा पाटील (8 वी अ विवेकानंद विद्यालय ) तृतीय श्रद्धा राठोड (8 वी अ कस्तुरबा विद्यालय ).
शालेय स्तरावर बक्षीस मिळवणारे विद्यार्थी गट 1 सत्यम इ 1 ली ते 4 थी प्रथम ओम चौधरी (4 थी अनेर) द्वितीय रुद्र बडगुजर (2 री अनेर) तृतीय चेतन भदाणे (4 थी तापी ) गट 2 शिवम इ 5 वि ते 7 वि प्रथम मयूर नेवे (6 वी अ) द्वितीय ममता कमलेश अहिरे (6 वी ड) तृतीय अशमिजा जरीन शेख नईम (7 वि उर्दू) गट 3 सुंदरम इ 8 ते10 वी प्रथम रक्षा चौधरी (10वी ग) द्वितीय कांचन महाजन (90वि ग) तृतीय कीर्ती नेवे (8वी इ) यांचा सत्कार केला. शिक्षक गट शालेय स्तर प्रथम दिपाली शाह, द्वितीय शाहीन मॅडम, तृतीय एन.एम.राजपूत तसेच उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कार नरेंद्र मोरेश्वर भावे मुख्याध्यापक ,राकेश विसपुते कलाशिक्षक विवेकानंद विद्यालय चोपडा, सुनील पाटील मुख्याध्यापक प्राथमिक विभाग प्रताप विद्या मंदिर चोपडा यांचा सत्कार करण्यात आला.
निबंध स्पर्धेतही बक्षिसांचा वर्षाव
निबंध स्पर्धेचेही बक्षिसे देण्यात आली यात एकूण 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यात गट 1 इ 5 वि ते 7 वि प्रथम नेहा पाटील (पंकज विद्यालय चोपडा) द्वितीय प्रतीक्षा साळी (प्रविम चोपडा) तृतीय पार्थ पाटील (विवेकानंद विद्यालय) गट 2 इ 8 वि ते 10 वि प्रथम भाग्यश्री सुनील बडगुजर (प्र वि म चोपडा) द्वितीय सारिका भगत (पंकज विद्यालय) तृतीय हिना तडवी (ओं.गो.पाटील माध्यमिक विद्यालय बिड्गाव) गट 3 इ 11 वि व 12 वि प्रथम पूजा चौधरी (प्र वि म ) द्वितीय शिवाजी चव्हाण (प्रविम) तृतीय नम्रता मराठे (प्रविम) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.