जळगाव। तणावमुक्त राहून काम केल्यास अधिक चांगल्या दर्जाचे काम होईल तसेच शारिरीक व मानसिक आरोग्य देखील चांगला राहिल त्यासाठी तणाव मुक्त राहून काम करण्याचे आवाहन डुप्लिन ट्रॅव्हेल मार्केटींग कंपनीच्या एक दिवसीय प्रशिक्षणात करण्यात आले.
दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या डुप्लिन मार्केटींग कंपनीच्या ग्राहकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन मंगळवारी 11 रोजी पत्रकार भवनात करण्यात आले होते. चंदीगढ शहरात प्रशिक्षण दिले जात मात्र जळगाव येथील ग्राहकांना चंदीगढला जाऊन प्रशिक्षण घेणे शक्य नसल्याने जळगावात प्रशिक्षणाचे आयोजन कंपनीतर्फे करण्यात आले. दिनकर हिरे, भारती हिरे, राजेश सोमण, वैशाली सोलंकी, शाम सोलंकी, भानुदास पवार, हर्षा पाटील आदींनी मार्गदर्शन केले. 50 ग्राहकांची यावेळी उपस्थिती होती. विविध प्रकारचे भेट वस्तु यावेळी ग्राहकांना देण्यात आल्या.