तणाव निर्माण करणार्‍या अडावदमधील दोघांना अटक

0

शांतता राखण्याबाबत पोलिसांनी केले आवाहन

अडावद– महापुरूषाच्या फलकाची विटंबना करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अडावद पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

समजलेल्या माहितीनुसार एका समाजाच्या दोन ते चार युवकांनी शुक्रवारी सायंकाळी महापुरूषाच्या फलकाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर ही बाब कळताच मोठ्या संख्येने पुरूष व महिलांचा जमाव अडावद पोलीस ठाण्यात जमला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन तरुणांना लागलीच अटक करीत त्यांच्याविरुद्ध भादंवि 295 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक सदाशीव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. नागरीकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.