तत्कालीन आयुक्त कापडणीस यांच्यावर कारवाईची मागणी

0

जळगाव । महानगर पालिकेचे 4 कोटी 86 लाख रूपये वाचविण्यात आल्याचा देखावा तात्कालीन आयुक्त संजय कापडणीस, नगररचना सहाय्यक निकम, महापालिकेचे विधी तज्ञ केतन ढाके यांनी केला होता असा आरोप कैलास सोनवणे यांनी केला. मालकाकडून 72 लाख 31 हजार 913 रूपयांचा टीडीआर भरूर घेणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून केवळ 25 लाख 91 हजार 623 रूपये भरून घेवून गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. तसेच न्यायालयात योग्य ती बाजू न मांडल्यामुळे महानगर पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. दोषींची एसीबी कडून चौकशी करण्यात यावी, तात्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या टिडीआर प्रकरणातील सर्व कागदपत्रे ताब्यात घ्या, तसेच दोषींची विभागीय चौकशी करून सर्व्हींसबुकमध्ये नोंद करावी अशी मागणी कैलास सोनवणे यांनी केली आहे. याप्रसंगदी व्यासपीठावर महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललीत कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, नगरसचिव डी. आर. पाटील उपस्थित होते.

दरम्यान विधी तज्ञ केतन ढाके यांचे नाव वगळण्यात यावे अशी मागणी आश्‍विनी देशमुख यांनी सभागृहात केली. विधी तज्ञ या नात्यांने त्यांनी महानगर पालिकेची बाजू न्यायालयात मांडली. यामुळे त्यांना दोषी न मानता त्यांना यातून वगळण्यात यावी असे सभागृहाच्या निर्देशनास आणून दिले. यावेळी वर्षा खडके यांनी तुम्ही ढाके यांचे वकील पत्र घेतले आहे का असा थेट सवाल आश्‍विनी देशमुख यांना केला. यावर तुम्हीमध्ये बोलू नका असे देशमुख यांनी खडसे यांना सुनावली असता मी का बोलू शकत नाही असा प्रतिप्रश्‍न वर्षा खडके यांनी केला.

संकुलांमधील रिकाम्या हॉलमुळे नुकसान
लढ्ढा यांनी महानगर पालिकेच्या संकुलांत हॉल रिकामे पडलेले आहेत. या हॉलची दुरावस्था होत असल्याने महापालिकेचे नुकासन होत आहे. तसेच हॉल रिकामे असल्याने मनपाचे आर्थिक नुकसान देखील होत आहे असे महापौर नितीन लढ्ढा यांनी निर्देशनास आणून दिले. निविदा काढण्यात आल्या होत्या परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने रिक्त गाळ्यांचा लिलाव करण्याचा टिपणी मंजूर करून लिलाव करण्याचा आदेश काढला असल्याची माहिती आयुक्त सोनवणे यांनी माहिती दिली. यावर सभागृह नेते रमेश जैन यांनी जाहीर लिलावाने गाळे विकावेत अशी सूचना मांडली. वर्षांनुवर्ष मालमत्ता पडून आहे व आर्थिक नुकासन होत आहे. सोनवणे- शासनाचा निर्णय आहे. नवीन हस्तांरण करण्यास अनुमती नाही. भाडे वसूल करण्याची स्थगीत केलेली नाही.

ठेक्यावरून भाजपा, खाविआत खडाजंगी
शहरातील महनगर पालिकेच्या अखतारित येणार्‍या 57 सार्वजनिक शौचलयांना दैंनदिन साफ सफाईसाठी पैसे द्या आणि वापरा(पे अ‍ॅड युवज) तत्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून महासभेत मांडण्यात आला होता. यावेळी भाजपा नगरसेवक व खाविआ नगरसेवक यांच्यात आकारण्यात येणार्‍या रकमेविषयी वाद निर्माण झाला. सार्वजनिक शौचालयाच्या वापरासाठी दर महिन्यांला प्रत्येक कुटूंबाकडून 70 रूपये आकारावा असा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला असता याला भाजपा नगरसेवकांनी विरोधदर्शविला. सार्वजनिक शौचालयाच्या वापरासाठी प्रत्येक कुटुंबाकडून इतर महानगर पालिकांमध्ये केवळ 40 रूपये घेण्यात येत असतांन शहरातील नागरिकांकडून 70 रूपये घेणे अन्यायकारक असल्याचे मत भाजपासदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी मांडले. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी ठेकेदाराल जास्त पैसे मिळावेत म्हणून ठरावा करण्यात येत आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर पलवाट करत नितीन बरडे यांनी हे ठेके तुम्ही घ्या असे आवाहन भाजपा सदस्यांना केले. याला दुजोरादेत महापौर नितीन लढ्ढा यांनी तुमच्या संस्थेला सर्व ठेके देवून टाकू, आरोग्याचे ठेके कोणाला गेले आहेत हे सांगायला लावू नका असा गर्भीत इशारा भाजपासदस्यांना दिला. तर खाविआचे कैलास सोनवणे यांनी नगरसेवकांचे आरोग्याचे ठेके असले की तक्रार नसते परंतु दुसर्‍यांच्या ठेका असल्यास तक्रारी कशा येतात असा प्रश्‍न उपस्थित केला. भाजपानगसेकांनी प्रस्तावास विरोध केल्याने प्रस्ताव बहुमताने मंजुर करण्यात आला.

राज्यशासनाचे निर्देशन मागविणार
एकूण 92 अस्थायी वाहन चालक असून सर्वांना समावून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. स्धया 48 पद रिक्त असून उर्वरीत 44 वाहन चालकांची पद निर्मितीस मान्यता देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आला होता. यावर सदस्य नरेंद्र भास्कर पाटील यांनी यात अस्थापनाचा खर्च वाढणार असल्याचे निर्देशानस आणून दिले. यावर महापौर नितीन लढ्ढा यांनी सर्वांसाठी अस्थापना खर्च 35 टक्के अट शिथील करण्यासाठी शासनाकडून मंजूरी मागविणार आहे. वाहन चालकांवर अन्याय होत असल्याचा हाय कोर्टांने वाहन चालकांवा कामवर राज्यशासनाचा हाय कोर्टाचा अवमान व वाहनचालकांवर अन्याय होणार नाही यासाठी राज्यशासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.

व्यापार्‍यांना सोबत घेऊन गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी
2011 -12 पासुन गाळ्यांचा प्रश्‍न आहे. यासाठी अनेक महासभा वाया घातल्या परंतु यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आले आहे. बी.जे. मार्केटचा गळा भाडेतत्वार देण्यात येत आहे. बंटी जोशी यांनी आयुक्त कापडणीस व निकम यांनी मनमानीप्रमाणे मोजमाप केले. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित आहे. आपल्या महापालिकेला पैसाचे निकड आहे. यामुळे गाळे प्रश्‍नांवर लवकारत लवकर निर्णय घेतल्यास आर्थिक परिस्थिती रूळावर येईल. गाळे प्रश्‍नसंदर्भात समिती स्थापन करणार होते. परंतु, ही समिती स्थापनच झाली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली. व्यापार्‍यांना व्यापार करावयाचा आहे त्यांना या भांडणात पडायचे नाही परंतु, होते काय आपण निर्णय बदलवतो मग ते मंत्री, कोर्ट, न्यायालयात जातात. यातून कोणताही निर्णय घेता येत नाही. त्वरीत निर्णय घेण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. उत्पन्न मिळेल पाच ते सहा वर्षांपासून प्रश्‍न प्रलंबित असल्याने व्यापार्‍यांना सोबत घेवून हा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपा सदस्या शुचिता हाडा यांनी बहीणाबाई गार्डन जवळील हॉकर्स येथे हॉकर्सला महापालिकेने स्थलांतरीत केले होते. मात्र, रस्ता रूदींकरणासाठी त्यांना पुन्हा विस्थापीत करण्यात येत आहे. त्यांच्या पर्याया जागा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच आस्वाद चौक, गणेश कॉलनी, महाराणा पुतळा येथे हॉकर्स बसत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावर महापौर नितीन लढ्ढा यांनी ख्वॉजामिया येथील पर्यायी जागा प्रशासनाने देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी पृथ्वीराज सोनवणे यांनी अतिक्रमण धारकांकडून जप्त करण्यात आलेला माल हा पैसे घेवून सोडण्यात येत असल्याची तक्रार केली. एका चौकांत गाडी जप्त केल्यानंतर दुसर्‍या चौकांत पैसे घेवून गाडी देण्यात येत असल्याचे फोटो सोनवणे यांनी सभागृहात सादर केले. यावर कैलास सोनवणे यांनी फोटो कधीचे आहेत याची विचारणा केली. तसेच फुले मार्केट येथील हॉकर्सवर कारवाई केली नाही तर अधिकार्‍यांना सोडणार नाही असा दम दिला. दरम्यान, जप्त करण्यात आलेली गाडी सोडविण्यासाठी ज्येष्ठ आमदारांनी आयुक्तांना फोन केला होता परंतु, आयुक्तांनी नाराजी त्या जेष्ठ आमदारांचे नाराजी ओढवून घेतली असल्याचे सांगितले. यावर भाजपासदस्यांनी गोंधळ घातला असता चीफ पब्लिसीटीसाठी विषयांतर केला जात असल्याचा आरोप महापौर नितीन लढ्ढा यांनी केला.

राज्यशासनाकडून प्रश्‍न प्रलंबित
चार गाळ्यांसंदर्भात शासनाची स्थगीती असल्याने हाय कोर्टाला याबाबत अवगत करण्यात आले असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले. अनंत जोशी यांनी व्यापार्‍यांना व्यापर करावयाच आहे. त्यांना मंत्री, न्यायालय, शासनाकडे जावू नये. व्यापार्‍यांना सोबत घेवून बैठक घेवून जुने भाडे चालु ठेवण्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. या ठरावाला स्थगिती आहे. 40 नंबर ठरावता केवळ चार जागांबाबत आहे. महापौर स्थगीती उठत नाही तोपर्यंत कारवाई करता येणार नाही. शासनाकडे 2012 पासुन लढा सुरू आहे. परंतु, राज्यशासनाकडूनच विषय प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचा आरोप केला.

सफाईचा ठेका रद्द
नवनाथ दारकुंडे यांनी प्रभाग क्र. 3 मध्ये कोणत्या महिला बचत गटाला देण्यात आलेला असल्याची विचारणा केली. तसेच साफ सफाईचा ठेका देण्यात आलेल्या परिश्रम बचत गटाला दंड करण्यात आला होता त्यांचा दंड वसूल करण्यात आला का ठेका 3 लाख रूपये महिन्यांचा ठेका आहे. यातून बंद कालावधीत दंड करण्यात येत आहे. ठेका रद्द करण्यात यावा दंड वसूल करणे हे आपले काम नाही महापौर नितीन लढ्ढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नितीन लढ्ढा हे महापौर झाल्यापासून प्रश्‍नत्तोरचा तास कमी झाला असल्याचा आरोप पृथ्वीराज सोनवणे यांनी केला. यावर महापौर लढ्ढा यांनी सदस्यांचा समाधान होत आहे. भाजपाचे किती प्रश्‍न प्रलंबित आहेत ते सांगू.