तत्कालीन उपशिक्षणाधिकार्‍यांसह चौघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा

सावदा : शहरातील सावदा येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमधील बोगस शिक्षक भर्ती प्रकरणी तत्कालीन उपक्षिणाधिकार्‍यांसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

यांच्या विरोधात नव्याने गुन्हा दाखल
सध्या चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी कल्पना दमडू चव्हाण, जिल्हा परीषदेतील कक्षाधिकारी किशोर विलास वानखेडे, चिंचोली येथील योगेश अशोक खोडपे, भुसावळातील शिक्षक शेख इक्बाल शेख कादर या चार जणांच्या विरोधात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आधीच एक शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी गोत्यात आले असताना पुन्हा उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकार्‍यांसह कक्ष अधिकार्‍यांना संशयीत आरोपी म्हणून समावेश करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता या नव्याने गुन्हा दाखल झालेल्या व मागील बड्या मंडळींना अटक होते की नाही ? याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वी देखील दाखल आहे गुन्हा
सावद्यातील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी संस्था चालकांसह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व अन्य पदाधिकार्‍यांविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.