तथागत फाऊंडेशनतर्फे कोठडे शाळेत पुस्तक वाटप

0

नंदुरबार। डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त येथील तथागत फाऊंडेशनतर्फे दि.18 एप्रिल 2017 रोजी नंदुरबार तालुक्यातील कोठडे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रजनीताई वळवी होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जयंत पाडवी, दारासिंग वळवी, अमृत पाडवी, सुभाष नाईक, मनोहर बैसाणे, शैलेंद्र पाडवी, नुतनबाई पाडवी, कृष्णा वळवी, अशोक वळवी, गणेश नाईक, ललिताबाई वळवी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय सोनार यांनी केले.

जि.प.शाळेत बाबासाहेबांना अभिवादन
नंदुरबार । तालुक्यातील कोठडे जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत पाडवी हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप पाडवी, प्रभाकर बैसाणे, अमृत पाडवी, राजु मिस्तरी, अशेाक दादा, अविनाश पाडवी, दिनेश पाडवी, हिरालाल मिस्तरी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. विजय सोनार व प्रकाश चौरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर माहीती विषद केली. कार्यक्रमास शिक्षक वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.