तनयने केलेली कामगिरी जळगावकरांसाठी अभिमानास्पद

0

जळगाव । जुलै महिन्यात सिंगापुर येथे झालेल्या आशियन योगा स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेत 14 ते 17 या वयोगटात तनय मल्हाराने अथेलेटिक योगा, फ्रि फ्लो डान्स योगा व आर्टिस्टिक योगा यामध्ये एकूण तीन सुवर्ण पदक मिळवून जळगावचे नाव उज्वल केले असून तनयने केलेली कामगिरी ही जळगावकरांसाठी अभिमानास्पद असल्याची माहिती योग गुरु अनिता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आशियन योगा स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेत 9 देशांतील समारे 178 स्पर्धक सहभागी झाले होते. यात भारतातील सुमारे सात गटांमध्ये 40 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात जळगावातील तनय मल्हारा व श्रद्धा पाटील या दोन स्पर्धकांनी सहभागी झाले होते. यात तनय मल्हारा यास तीन सुवर्ण पदक व एका ब्रॉन्झ पदक पटकविले आहे. तसेच श्रद्धा पाटील हीला एक ब्रॉन्झ पदक मिळाले आहे.

10 आसनाचे सादरीकरण
स्पर्धेसाठी अनेक स्तरांवर निवड होणे आवश्यक असते. त्यात तनयने आपले कौशल्याचे कसब दाखवून योगा फेडरेशन ऑफ इंडियातर्फे त्याची 14 ते 17 या वयोगटात निवड करण्यात आली. त्यानंतर योगगुरु अनिता पाटील यांनी त्याची सुमारे दोन महिने दररोज पाच तास त्याच्या कडून योगाचा सराव करुन घेतला असल्याचे योगगुरु पाटील यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे अथेलेटिक योगा स्पर्धेत स्पर्धकाला सुमारे 10 आसनांचे सादरीकरण करावयाचे असते.

पेपर सादरीकरण
तनयने दहा पैकी सात आसनांचे सादरीकरण करुन यात विशेष प्राविण्य मिळविले आहे. तसेच अनिता पाटील यांनी तनय कडून करुन घेतलेल्या आर्टिस्टिक सोलो व पेपर योगा या प्रकारात तनयने आर्या तांबे हीच्या सोबत सादरीकरण केले. त्या दोघा स्पर्धकांना फ्युजन व पिरॅडिड या प्रकारात ब्रॉन्झ पदक मिळाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. तनयला जाणता राजा प्रतिष्ठानचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यावेळी डॉ. नलिनी मल्हारा, रुद्राणी देवरे, मनोज पाटील, अनिता पाटील आदी उपस्थित होते.