तनुश्री-नाना वादावर आता अन्नू कपूरची टिप्पणी

0

मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये तनुश्री-नाना वादावर अनेक अभनेते आपली मते देताना दिसत आहेत. अश्यातच, अभिनेते अन्नू कपूर यांची प्रतिक्रियही आली आहे. जर महिलेशी गैरवर्तन होत असेल आणि ते सिद्ध झाले, तर त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. भले तिथे नाना पाटेकर, अन्नू कपूर किंवा मोदी असो. परंतु, त्यासाठी आरोप सिद्ध होणे गरजेचे असल्याचे गरजेचेही आहे असे अन्नू कपूर म्हटले.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होईल, असे महाराष्ट्राचे गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाचे समर्थन करत अन्नू कपूर यांनी तनुश्रीला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.