येडशी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तपासणी पथके नियुक्त केली आहेत. येरमाळा महामार्गावर पथके तैनात करण्यात आलेले आहे. दरम्यान आज गुरूवारी पहाटे एक भरधाव कंटेनर तंबूत घुसल्याने भीषण अपघात झाला. यात दोन कर्मचारी जागीच ठार झाले आहेत. दीपक नाईकवडी आणि जोशी अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यात सर्वत्र महामार्गांवर तपासणी पथके नियुक्त केली आहेत. येरमाळा महामार्गावरील येडशीजवळ आयोगाचे एक पथक तैनात करण्यात आलेले आहे.