तपासाअंती पठाणांवर करणार कारवाई

0

जळगाव : महानगरपालिकेत नोकरी, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तात्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद पठाण यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात तात्कालिन उपायुक्त पठाण यांची सखोल चौकशी व तपास करून त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

उपायुक्त पठाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
मनपात नोकरीला लावून देणे, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद अमानउल्ला पठाण (वय-50 रा.शिवाजी नगर,जळगाव) यांच्याविरोधात 35 वर्षीय विधवा महिलेने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पठाण यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विधवा व गरीब महिलांना मनपाकडून घरकुल मिळेल अशी 2011 मध्ये वृत्तपत्रात जाहीरात आल्यानंतर पीडित विधवा महिला एका महिलेसोबत महापालिकेत उपायुक्त साजीद पठाण यांना भेटायला गेली होती. त्यावेळी पठाण यांनी नोकरीला लावूनज देण्याचे आश्‍वासन दिले व त्यांचा मोबाईल क्रमांक देऊन नंतर भेटण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर पठाण व पीडित महिला या दोघांमध्ये संपर्क वाढत गेला.

शंभू सोनवणेच्या घरात केला अत्याचार
2012 मध्ये पठाण यांनी नोकरीचे कारण सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे राहणार्‍या शंभू सोनवणे यांच्या घरात व कार्यालयात बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी मनस्थिती खराब झाल्याचे पाहून पठाण यांनी लग्नाचे आमिष दाखविले. शंभू सोनवणे यांच्या घरातील प्रकारानंतर पठाण यांनी एक महिन्याने लग्नासाठी औरंगाबादला जायचे आहे असे सांगून सरकारी कारमध्ये औरंगाबादकडे नेले. तेथे रस्त्यात अजिंठा गावाच्या पुढे गेल्यावर कोणाचा तरी फोन आला व त्यावेळी पठाण यांनी कार माघारी घेतली. मोकळ्या स्मशान जागी कार लावून त्यातच जबरदस्तीने पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर पुन्हा गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांच्या दवाखान्यात बोलावून तेथेही अत्याचार केला.

शंभू पाटील, डॉ.राजेश पाटील सहआरोपी
अत्याचार प्रकरणात डॉ.शंभू पाटील व गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांनी एक प्रकारे पठाण यांना मदत केली आहे. त्यामुळे पीडित महिलेने या दोघांविरुध्दही तक्रार दिल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. 2016 नंतर साजीद पठाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाल्याने त्याने संपर्क कमी केला व लग्नही केले नाही. सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर तपास करीत आहेत.