तपासाच्या नावाखाली होते आहे मारहाण; सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांचा आरोप

0

मुंबई-वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याचा तपास सुरु असून पोलिसांनी काही संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. तपासाच्या नावाखाली एटीएसडून अटक करण्यात आलेल्या चौघांचा छळ सुरू आहे असा गंभीर आरोप सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनी एटीएसच्या हेतूवरच संशय व्यक्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांना मारहाण करण्यात येते आहे. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. शरद कळसकर हा मूळचा औरंगाबादचा आहे. सुधन्वा जोगळेकर हा संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित आहे. मात्र या सगळ्यांना मारहाण करण्यात येते आहे. चौकशीच्या नावाखाली या सगळ्यांना मारहाण करण्यात येते आहे असे पुनाळेकर यांनी म्हटले आहे.

नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.