तपोवन परिसरात दुषित पाणीपुरवठा

0

पिंपरी – पिंपरी गावातील तपोवन मंदिर भागातील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी गढूळ येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रभागातील नगरसेवकांना वारंवार याबाबत तक्रार करूनही उपयोग नाही. जाणूनुबुजुन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहे. गढुळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने गढूळ पाण्याचा पुरवठा होणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाला आदेश द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. नागरिकांना अस्वच्छ गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत येथील नगरसेवकांकडे या समस्येबाबत माहिती देऊनही शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोणताही प्रयत्न नगरसेवक व पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी केला नाही.