सहा जणांविरोधात गुन्हा दाखल; रुग्णालयाऐवजी तरुगांत बंद करण्याचा विचार
गाझीयाबाद – जगभर हाहाकार माजविणार्या कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रणांगणात उतरले आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता तबलिगीच्या संशयित करोनाग्रस्तांवर उपचार सुरु असतात हे रुग्ण वैद्यकीय कर्मचार्यांसोबत गैरवर्तन करत असल्याची माहिती समोर आली आहे.
गाझीयाबादमधील एमएमजीमध्ये दाखल करण्यात आलेल्या काही तबलिगींनी वैद्यकीय कर्मचार्यांसोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. काहींनी तर उपचारासाठी आलेल्या परिचारिकेसमोरही कपडे बदलण्यासारखी अश्लील कृत्य केल्याची माहिती खुद्द रूग्णलालयाचे सीएमएलएस रविंद्र राणा यांनी दिली. गाझीयाबाद जिल्हा प्रशासनाने या लोकांविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे आणि त्यांना तुरूंगातील बॅरेकमध्येच बंद करण्यावर विचार सुरू आहे. रुग्णालयातील क र्मचार्यांसोबत अश्लील वर्तन, गोंधळ घालणे आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ६ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र राणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तबलिगीचे संशयित रुग्ण रुग्णालयातच सतत या अश्लील कृत्य करत आहेत. तसेच रूग्णालयाच्या कर्मचार्यांसोबत गैरवर्तनही करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते मोठा गोंधळ घालतात. इतकंच काय तर उपचारासाठी आलेल्या परिचारिंकासमोरही कपडे बदलण्यासारखे प्रकार करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.