तबलिगी आणि रोहिंग्यांचे ‘कनेक्शन’ उघड; केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना पत्र

0

नवी दिल्ली – रोहिंग्या मुस्लिमांनी तबलिगी जमातच्या इज्तिमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती समोर आली आहे. याची दखल घेत, केंद्रीय गृह गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून रोहिंग्या आणि तबलिगी जमातमधील संबंधांचा तपास करण्यास सांगितले आहे. सोबतच रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्यांशी संबंधित लोकांची करोना चाचणी करण्यासही सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांचे पोलीस प्रमुख आणि मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात सांगण्यात आले आहे की, रोहिंग्या मुस्लिमांनी तबलिगी जमातच्या इज्तिमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती मिळत आहे. यामुळे त्यांना करोनाची लागण झाली असल्याचा संशय आहे. या पत्रात हैदराबाद, तेलंगण, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि मेवाट येथील रोहिंग्यांवर विशेष लक्ष देत ओळख पटवण्यास सांगण्यात आले आहे.

तेलंगणमध्ये वास्तव्यास असणार्‍या रोहिंग्यांनी तबलिगी जमातच्या हरियाणामधील मेवाट येथील कार्यक्रमात हजेरी लावली होती. हेच लोक दिल्लीमधील निजामुद्दीने मरकजमध्येही सहभागी झाले होते. रोहिंग्यांशी संबंधित लोक श्रमविहार आणि शाहीनबाग येथेही गेले होते. पत्रानुसार जे लोक या ठिकाणांवर गेले होते ते आपल्या छावण्यांमधून गायब आहेत. तबलिगी जमातशी संबंध आल्याने रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्याशी संबंधितांची करोना चाचणी करणे महत्त्वाचे असल्याचे पत्रात म्हटले आहे.