तब्बल तीन तपाच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांची भेट : जुन्या आठवणीत विद्यार्थी गहिवरले

0

रावेरच्या सरदार जी.जी.हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

रावेर- तब्बल 36 वर्षे म्हणजे तीन तपाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर येथील सरदार जी. जी. हायस्कूल मधील सन 1982 च्या बॅचच्या बारावीच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रावेर येथे बुधवारी झाला. राज्यातील कान्याकोपर्‍यात नोकरी, उदरनिर्वाह, विविध क्षेत्रात काम करणारे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी एकत्र आले. जुन्या आठवणीत विद्यार्थी रमले तर विविध कार्यक्रमांनी हा मेळावा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला.

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
सौ.कमलाबाई एस.अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये हा स्नेहमेळावा झाला. रावेर, जळगाव, धुळे, प्रवरानगर, पुणे, मुंबई यासह विविध भागातून 55 माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी बुधवारी सकाळी येथे दाखल झाले. इतक्या कालावधी नंतर एकमेकांना भेटलेलल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसुन येत होता. प्रत्येक जण एकमेकांची आस्थेवाईक पणे चौकशी करत होता. तब्बल 36 वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील आठवणींना या मेळाव्याच्या निमित्ताने उजाळा मिळाला.

दरवर्षी होणार स्नेहमेळावा
सकाळी प्रथम सर्वांनी एकमेकांचा परीचय करवून दिला. यानंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुरूजनांचे स्मरण करून नंतर हास्य, मनोरंजन, विविध गीते यामुळे हा स्नेहमेळावा उत्तरोत्तर रंगत गेला. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावर आनंद द्विगुणित झाला होता. प्रति वर्षी स्नेह मेळावा घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले. यावेळी पत्रकार सतीश नाईक, प्रशांत वाणी, विद्या अग्रवाल (लोहाणा), माया काळे, पराग पैठनकर, श्याम दुबे, शामराव महाजन (रावेर), व्ही.डी.पाटील (केर्‍हाळे), व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार (धुळे), हेमंत (राजू) दलाल (नाशिक), किरण वाणी (अंबरनाथ), शोभना वाणी (बदलापूर), ललिता राणे (पुणे), सिंधु राणे (प्रवरानगर), शोभा भोसले मुख्याध्यापिका (धुळे), सुनीता वाणी, मुख्याध्यापिका (रावेर), डॉ.सुधाकर चौधरी (वाघोड), कालिदास सोनार (अकोला), रवींद्र भुसे (औरंगाबाद), निलीमा राणे (बामणोद), मंगला पाटील, सुनंदा कोल्हे, ललिता नेमाडे, जयश्री नाईक सर्व जळगाव आदी 55 विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. तब्बल 36 वर्षांनंतर बारावी वाणिज्य वर्गातील सहकार्‍यांना
या मेळाव्याचे अनुषंगाने एकत्र आणण्यासाठी पत्रकार सतीष नाईक, विद्या अग्रवाल (लोहाणा), प्रशांत वाणी आदींनी नियोजन केले.