मुंबई : तब्बूची नाराजी घालवण्यासाठी मनाली रायसनमध्ये अजय देवगन बरीच कसरत करावी लागत आहे सिंघमने तब्बूला मनविण्यासाठी फुलांने भरलेला पुष्पगुच्छ दिला. यानंतर तब्बूच्या चेहऱयावर आलेल्या हलक्या हास्याने परिसरच आनंदमयी झाला. सध्या मनालीतील रायसनमध्ये ‘दे दे प्यार दे’ या बॉलिवूड चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटातील काही दृश्य चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माता मोठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहे.
चित्रपटाची शूटींग पाहाण्यासाठी असंख्य चाहता वर्ग उपस्थित होते. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कलाकारांसोबतच देखील दिग्दर्शकाचीही दमछाक उडाली . अजय देवगन, तब्बू आणि जिमी शेरगिल यांच्या चाहत्यांनी पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी केली होती. मात्र, यातील एकही व्यक्तीला आत सोडू नये, असे सुरक्षारक्षकांना सांगितले गेले होते. पुढील एक महिना या चित्रपटाची शूटींग मनालीमध्येच केली जाणार असून, चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाल्याचे बोलण्यात येत आहे .