जळगाव। मरी आईच्या यात्रेनिमित्त आव्हाणे शिवारात तामाशाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शुक्रवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास तमाशात पिंपाणी वाजविण्याच्या कारणावरून वाद झाल्याने मारहाण झाल्याची घटना घडली.
आव्हाणे शिवारात यात्रेत रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या तमाशात अमोल सपकाळे, सुपडू सपकाळे, लकी सपकाळे, किरण सपकाळे हे उपस्थित होते़. यावेळी अमोल हा पिंपाणी वाजवून नाचणार्या लोकांना त्रास देत होता. याबाबत आकाश पाटील व त्याचे काका यांनी अमोल यास जाब विचारला असता त्याचा राग आल्याने अमालेने आकाश व त्याच्या काकाला लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. तसेच सुपडू, लकी, किरण यांनी शिवीगाळ केली. याघटनेसंदर्भात अकाश पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीतांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हेकॉ. राजेंद्र बोरसे हे करीत आहेत.