तमिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; ७ जण ठार

0

कुडलोर: तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.